महाराष्ट्र ग्रामीण
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाकुंभमेळ्याला हजेरी; सहकुटुंब केलं गंगेत पवित्र स्नान

Devendra Fadnavis: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी आज तीर्थराज प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला हजेरी लावली असून यावेळी त्यांनी सहकुटुंब महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान केलंय.
या दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत बैठक घेतली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक , अतिरिक्त मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्लादेखील बैठकीला हजर होते. यावेळी या बैठकीत नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयात आढावा घेण्यात आला.
दरम्यान, यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तीर्थराज प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला हजेरी लावली.
यावेळी त्यांनी सहकुटुंब महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान आणि पूजा अर्चना केली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंगेत डुबकी मारत पवित्र स्नान केलं. यावेळी पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी देखील उपस्थित होती.