आमचे कुणीच काहीही वाकडे करू शकत नाही..!
बुलढाणा जिल्हा परिषद मधील बोगस अपंग कर्मचाऱ्यांच्या चर्चेला उधान..?
बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागामध्ये बोगस अपंग प्रमाणपत्र सादर करून शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणाऱ्या कर्मचाऱ्यांची फेरवैद्यकीय तपासणी करण्यात यावी असे स्पष्ट शासनाचे आदेश असताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले आहे तसेच बुलढाणा जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री खरात या प्रकरणांमध्ये टाळाटाळ करत आहे या प्रकरणांमध्ये संबंधित सर्व अपंग प्रमाणपत्र ज्या लोकांनी सादर केले त्यांची फेरवैद्यकीय तपासणी होणे गरजेचे आहे यासाठी बुलढाणा जिल्हा परिषदेला शासन स्तरावरून आदेश सुद्धा प्राप्त आहे परंतु या प्रकरणांमध्ये बोगस अपंग कर्मचाऱ्यांना अभय देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले आहे तसेच शिक्षणाधिकारी खरात हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाच या प्रकरणात कारवाई करण्याचे अधिकार असल्याचे वारंवार बोलत आहे सदर प्रकरणाचे फाईल खूप दिवसापासून दाबून ठेवण्यात आले आहे या प्रकरणाकडे शासनाने लक्ष देणे फार गरजेचे झाले आहे बोगस अपंग प्रमाणपत्र सादर करून मूळ अपंग कर्मचाऱ्यावर अन्याय करणाऱ्या बोगस कर्मचाऱ्यावर कारवाई होणे क्रमप्राप्त आहे परंतु प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून अशा बोगस कर्मचाऱ्यांना अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आले नाही या उलट त्यांना बळ व अभय दिल्या जात आहे बोगस अपंग कर्मचाऱ्यांकडून वारंवार बोलल्या जात आहे की आम्ही सर्व यंत्रणा मॅनेज केली आहे आमचे कुणीही काहीच वाकडे करू शकत नाही आर्थिक देवाण-घेवाण करूनच आम्ही हे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे त्यामुळे असे किती पत्रकार येतात आणि जातात हे आम्ही खूप वर्षापासून बघत आहोत आमचे आद्यापर्यंत कोणीच काही वाकडे करू शकले नाही तर हे काय करणार अशा पद्धतीने चर्चा या बोगस अपंग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक प्रशासकीय अधिकाऱ्याकडून दुर्लक्ष होत असले तरी व अपंग बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी दैनिक गुड मॉर्निंग सिटीजन या सर्व प्रकरणाच्या विरोधात नागपूर उच्च न्यायालयात धाव घेणारा असून सत्य काय आहे ते लवकरच जनतेसमोर मांडणार आहे